सिंधुदुर्ग : भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानेही (Sindhudurg Sessions Court) दणका दिला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक (Arrest) होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व (Pre-arrest bail) जामिनासाठी धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवस पोलीस अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे पोलिसांना अजूनही नितेश राणे यांना अटक करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नितेश राणे यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यासाठी सल्ला दिला होता. त्यानुसार राणे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

या अटकपूर्व जमीन अर्जावर सोमवारी दोन्ही बाजूनी सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद तब्बल साडेपाच तास चालला होता. मंगळवारी निकाल देण्यात येईल असे न्यामूर्तनी सांगितले होते.

त्यानुसार आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यामध्ये नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

Advertisement