सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Attack) हल्ला प्रकरणाला नवीन वळण आले असून यातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक झाली आहे. परंतु या हल्याचा कट पुणे (Pune) येथून शिजला असल्याचा संशय पोलिसांना (Police) आहे. त्यामुळे आता पुढील तपास पुण्यात होणार आहे.

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने (Sindhudurg Sessions Court) भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर नितेश राणे यांनी अमित शहा (Amit Shah) आणि चिदंमबरम यांचा फोटो ट्विट करत “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” असे कॅप्शन दिले होते.

हे केलेले ट्विट नितेश राणे यांना डिलीट करावे लागले आहे. २००९ ला पी. चिदंमबरम (P. Chidambaram) गृहमंत्री असताना अमित शाह यांना अटक झाली होती, तर अमित शाह गृहमंत्री असताना चिदंमबरम यांना अटक झाली होती.

Advertisement

नितेश राणे यांना हे ट्विट करून महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडी सरकारला हे सांगायचे होते की, आमचीही वेळ येईल तेव्हा तुमचेही हेच हाल होतील असे या ट्विटचा रोख महाविकास आघाडीकडे होता.

नितेश राणे यांचे हे ट्विट जणू महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला इशाराच असल्याची चर्चा रंगली होती. हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

नितेश राणे यांना हे ट्विट करत दिल्लीतल्या नेत्यांपर्यंत जाणे महागात पडले आहे. त्यामुळे त्यांना ट्विट डिलीट करावे लागले आहे.

Advertisement