पुणे – पुणे शहरातील (pune) वाहतूक कोंडी (traffic) ही दिवसागणित वाढतच चाली असून, सामान्य पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक महत्वाच्या चौकांमध्ये तर तासन् तास वाहनांच्या (traffic) रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. 

दरम्यान, आता पुण्यातील वाहतूककोंडीचा (Traffic jam) प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी हवाई बसचा पर्याय मांडला.

रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या आणि होणाऱ्या खोळंब्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नवा पर्याय चर्चेसाठी ठेवला आहे. वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी गडकरी यांनी हवेतून चालणाऱ्या बसचा पर्याय पुण्यातील लोकप्रतिनिधींसमोर ठेवला.

त्यांनी चर्चा करावी आणि त्याचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही केल्याचे सांगितले. हवेतील बसमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मात्र, ही हवाई बस कशी असेल, त्याची सुरक्षा, स्वरूप याबाबत कोणतेच भाष्य त्यांनी केले नाही. दरम्यान, यावेळी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चांदणी चौक परिसरास भेट दिली.

यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आणि पुण्याशी जोडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर या रस्त्याच्या कामासंदर्भात महामार्ग आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठकही त्यांनी घेतली.

यावेळी त्यांनी पुणे शहरातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन सुद्धा सांगितला आहे. पुणे शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा (Traffic jam) मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुण्याचीचांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला….

झालं असं की.., 27 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याचीचांदणी चौकातील (Chandani Chowk Pune) हायवेवरुन साताऱ्याला जात होते.

त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा (Eknath Shinde) ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला. आणि हा ताफा अडकल्यानंतर पुणेकरांनी त्यांना गाठलं.

आणि वाहतूक कोंडी कधी फुटणार? असा सवाल पुणेकरांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारला आहे.