पुणे : कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाच्या नवनव्या विषाणूचे व्हेरिएन्ट समोर येत आहेत. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन विषाणूचा

ओमिक्रॉन व्हेरिएन्ट समोर आला आहे. या नव्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत.

कोरोना विषाणूचे रुग्ण कमी झाले आहेत. यामुळे नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. पुणे महापालिका भवनात मास्क न घालणाऱ्या नागरिकांना प्रवेश नाकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Advertisement

महापालिका भवन परिसरात विनामास्क आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.

महापालिकेत दररोज विविध कामांसाठी नागरिक येत असतात. बहुतांश लोक मास्कचा वापर करतात. काही मोजकी मंडळी मास्क लावत नाहीत. काहींचा मास्क हनुवटीवर तर काहींचा खिशात असतो. काही जण रूमाल वापरतात.

आता विनामास्क व्यक्तींना पालिका भवनात प्रवेश दिला जाणार नाही. विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जाईल.

Advertisement

क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूंवर अद्याप कोणतेही औषधे सापडलेली नाहीत. अशातच कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिएन्ट समोर येत आहेत. पुण्यामध्येही ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण सापडले आहेत.

महापालिका भवनात विविध कामासांसाठी हजारो नागरिक येत असतात. मात्र हे नागरिक कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. महापालिका कर्मचारीही कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

यामुळे महापालिका प्रशासनाने विनाकास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क नसणाऱ्या नागरिकांना महापालिकेत प्रवेश मिळणार नसल्याचे आदेश महापालिकेकडून काढण्यात आले आहे.