पुणे – बाबासाहेब पुरंदरेंची (Babasaheb Purandare) भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. यावेळी पुण्यात बोलत होते. तसेच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नुकतंच, डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते तर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, राजकुमार घोगरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रशेखर शिखरे आदी उपस्थित होते. पुण्यात हा सोहळा पारपडला.

नेमकं शरद पवार काय म्हणाले…

“महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला.

माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला”, असं पवार (Sharad Pawar) म्हणाले.

तसेच, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांचे योगदान काय, याच्या खोलात मला जायचे नाही. पण राजमाता जिजाऊ याच शिवाजी महाराज यांच्या गुरू, मार्गदर्शक होत्या, हे स्पष्ट झाले आहे, असं देखील पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांवर आसूड ओढला. काहींनी चुकीचा इतिहास लिहिला, असे म्हणत शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर टीकाच केली.

हा ग्रंथ वाचल्यानंतर अनेकांचा असा समज होईल हे शिवचरित्र आहे. मात्र हे शिवचरित्र नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.