ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

भयंकर! बक्षिसं दिलं नाही, म्हणून चिमुरडीची हत्या

घरात नवा पाहुणा आला, की तृतीयपंथी संबंधित घरी पैसे मागायला जातात. ती बक्षिसी असते. बक्षिसी नाही दिली, की हेच तृतीयपंथीय शिव्या-शाप देतात. त्यावरही कडी करणारी एक घटना मुंबईत घडली.

आतापर्यंत आपण मुंबईतील रुग्णालयातून बाळ पळवल्याच्या घटना घडल्या आहेत; पण काल रात्री मुंबईच्या कफ परेड परिसरातून एका घरातून तीन महिन्याचं बाळ पळवण्यात आलं. त्यानंतर त्या बाळाची हत्या करण्यात आली. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

साडी, नारळ, ११०० रुपयांची मागणी

कफपरेड आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या बाळाच्या घरी एक तृतीयपंथीय पोहोचला. बक्षिसात पैसे दिले नाहीत, म्हणून या तृतीय पंथीयाने तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली.

मुलगी झाली म्हणून तृतीयपंथीय बक्षीस मागण्यासाठी गेला होता. त्यांनी मुलीच्या पालकांकडे एक साडी एक नारळ आणि अकराशे रुपयाची मागणी केली.

रात्री ९.३० च्या सुमारास बक्षीस मागण्यासाठी म्हणून तो घरी गेला होता. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्या तृतीयपंथीयांची मागणी मुलीचे पालक पूर्ण करू शकले नाही. त्याचा राग मनात धरून तृतीयपंथीय तिथून निघून गेला.

काय घडलं ?

रात्री २ ते ३ च्या सुमारास आपला जोडीदार सोनू सोबत तृतीयपंथीय तिथे गेला आणि त्या मुलीचं अपहरण केलं. अपहरण करून त्या मुलीला कफ परेड येथील आंबेडकर नगरच्या मागील खाडीत जिवंत पुरलं.

पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि तात्काळ प्रभावाने या दोघांना अटक केली.

 

You might also like
2 li