वाडा (ता. खेड) येथे महावितरणच्या वतीने ग्राहकांच्या वीज विषयक समस्या सोडविण्यासाठी ८ तारखेपासून ‘एक दिवस, एक गाव’ अभियानाची सुरुवात करण्यात आली.

वीज ग्राहकांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण व वीज ग्राहकांशी संवाद साधने हा या अभियानाचा उद्देश आहे.

ग्रामीण भागामध्ये तक्रारींचे निवारण व विविध योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी एक दिवस एक गाव अभियानांतर्गत शेतकरी कृषिपंपासह इतर नवीन वीज जोडण्या, वीजबिलांची दुरुस्ती, विविध तक्रारींचे निवारण, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्यवाही या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisement

या शिवाय वीजग्राहकांना ऑनलाइन ग्राहकसेवा, वीजबचत व सुरक्षा तसेच कृषी वीजबिलांच्या थकबाकी व मुक्तीसह कृषिपंप वीजजोडणी धोरणाची सविस्तर माहिती या मेळाव्यात देण्यात आली.

वाडा, वाळद, अव्हाट, चिखलगाव, डेहणे, नायफड, गोरेगाव, मोरोशी, टोकावडे यांसह परिसरातील अन्य गावांमधील नाराज झालेल्या ग्राहकांना याचा फायदा झाला, त्यातील तेवीस ग्राहकांना नवीन वीज जोड, पस्तीस ग्राहकांचे वीज बिल दुरुस्ती यांसह अन्य ग्राहकांचे तक्रारींचे निवारण करण्यात आले.

यावेळी खेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे, वाडा शाखा सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर बोरचटे, राहुल पालके, स्वाती पाटील, संजय उदगिरी यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

कार्यक्रमाचे नियोजन वरिष्ठ यंत्रचालक योगेश पावडे, दगडू सुरकुले, सोमनाथ मोरमारे, गोरख उगले, लहू बनगर, विलास वळवी, सखाराम चौरे तसेच वाडा शाखेतील सर्व कर्मचारी यांनी केले.

या नावीन्यपूर्ण अभियानाचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे पंचायत समितीचे माजी सभापती काळूराम यांनी उपस्तीत नागरिकांना केले.

Advertisement