सोन्याची खरेदी तीन वेगवेगळ्या कारणास्तवर केली जाते. एक म्हणजे दागिने घडविण्यासाठी, दुसरी खरेदी गुंतवणूक म्हणून आणि तिसरी सट्टेबाजीसाठी. जर तुम्ही दागिने बनविण्यासाठी सोनेखरेदी करणार असाल, तर एक गोष्ट नीट समजून घ्या, सोन्याचा भाव फारसा महत्त्वाचा नाही.

हौसेला मोल नाही, आज तुम्ही १९ हजार रुपयांच्या दराने सोने खरेदी केले व वर्षभराने भाव १५ हजार झाला म्हणून सोन्याचा दागिना घालण्याची हौस काही कमी होत नाही. तसेच सोन्याचा भाव २५ हजार रुपये झाला म्हणून अंगावर घातलेल्या सोन्याची झळाळी वाढत नाही.

Now you can buy gold for just a hundred rupees

Advertisement

तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. तनिष्क, कल्याण ज्वेलर्स कडून तुम्ही ऑनलाइन ज्वेलरी केवळ 100 रुपयांत खरेदी करू शकता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भारतातील ज्वेलर्सनी 100 रुपयांपर्यंतचे सोने ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली आहे.(Now you can buy gold for just a hundred rupees)

लॉकडाऊनमुळे टाटा समूहाचा ज्वेलरी ब्रँड असलेले तनिष्क, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, पीसी ज्वेलर्स लिमिटेड आणि सेन्को गोल्ड अँड डायमंड्स यासारख्या ज्वेलर्सना 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सोने ($ 1.35) थेट त्यांच्या वेबसाइटवर किंवा टाय-अप करून विकण्याची परवानगी मिळाली.

याला डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म असे नाव देण्यात आले आहे. कमीतकमी 1 ग्रॅम सोने असणे पुरेसे गुंतवणूक केल्यानंतर ग्राहक डिलिव्हरी घेऊ शकतात.डिजिटल सोन्याची विक्री आता भारतासाठी नवीन नाही. मोबाइल वॉलेट आणि प्लॅटफॉर्म जसं की ऑगमोंट गोल्ड फॉर ऑल आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिल सेफगोल्ड प्रोडक्टसाठी चर्चेत आहे.

Advertisement

आत्तापर्यंत ज्वेलर्स अशी उत्पादने ऑनलाइन कण्यास टाळाटाळ करत होते, ही उत्पादने त्यांच्या स्टोअरमध्येच विक्री केली जात असे. भारतात अद्यापही अशास्वरुपात खरेदीला पसंती दिली जाते. दरम्यान असं असलं तरीही डिजिटल गोल्डची मागणी गेल्या काही काळापासून वाढली आहे.