नाशिक : ओबीसी आरक्षणावरून ( OBC Reservation) राज्यात चांगलेच वातावरण तबल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये (Opposition) ओबीसी आरक्षणावरून चांगलीच जुंपली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ओबीसी आरक्षण विधेयकावर सही का केली नाही हे सांगितले आहे.

राज्यपालांचा गैरसमज झाला असून, त्यामुळेच त्यांनी सही करायला नकार दिलाय. त्यामुळे आता दोन-तीन मंत्र्यांना घेऊन त्यांना भेटणार आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Advertisement

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आपण अगोदर ओबीसी अध्यादेश तयार केला होता. आयोग नेमून कामाला तयार झालो. त्या अध्यादेशावर राज्यपाल यांची सही झाली होती.

तो एकमताने मंजूर ही करण्यात आला होता. त्याला सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) विरोध केला नाही. तर तेव्हा इम्पिरिकल डाटा मागितला होता. त्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला होता.

तेव्हा भाजपनेही (BJP) सपोर्ट केला होता, आता या प्रकरणात राज्यपालांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे त्यांनी सही करायला नकार दिला आहे असेही छगन भुजबळांनी सांगितले आहे.

Advertisement

या विषयात राजकारण करू नये. मला आशा आहे की, राज्यपाल महोदय हा विषय समजून घेतील. निवडणुका (Elections) डोक्यावर आहेत.

ओबीसी आरक्षण मिळावे असे वाटते. मी भेट घेतली तेव्हा हे प्रकरण माहिती नव्हते. त्यामुळे चर्चा झाली नसल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Advertisement