मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गोव्यात (GOA) विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावरूनच भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. गोव्यात आदित्य ठाकरे यांनी निवडणुकांबाबत भाष्य केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावला आहे.

शिवसेना भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. गोव्यात शिवसेनेला सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यातील राजकारणात पक्ष अधिक सक्रियपणे उतरेल असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Advertisement

त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, आदित्यजी आधी वांद्र्यातून शिवसेनेचा आमदार तर निवडून आणून दाखवा.

राज्यात १०० आमदार (100 MLA) जिंकून आणण्याचे तुमच्या पक्षाचे वांधे, जेवढे आहेत ते राहतील की नाही याची मारामार… तरीही तुमचा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे असे म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

Advertisement

महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती होती. सदर युती चांगल्या पद्धतीने पुढे जावी अशी अपेक्षा होती. शिवसेनेकडून युती पुढे नेण्याचा प्रयत्नही झाला. भाजपला अडचण होऊ नये यासाठी शिवसेना गोव्यातील राजकारणात फारशी सक्रिय नव्हती.

मात्र शिवसेच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळेच आता शिवसेना गोव्यातील सक्रिय राजकारणात उतरत आहे. मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, सिलवासा येथे सुद्धा शिवसेनेने उमेदवार उभे केले असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

Advertisement