Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अजब-गजब :एका आइस्क्रीम स्कूपची किंमत आहे एक तोळा सोन्यापेक्षाही जास्त; जाणून घ्या विशेष

तुम्हाला आईस्क्रीम आवडते का? जर होय तर तुम्हाला एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही कधी विचार केला आहे की, जर आइस्क्रीममध्ये सोने मिसळले असेल तर त्याची चव कशी असेल? किंवा किती खर्च येईल? कदाचित आपण यापूर्वी कधीच याचा विचार केला नसेल.

पण आता विचार करा, कारण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आइस्क्रीमची माहिती देणार आहोत, ज्यात सोन्याचे मिश्रण आहे. या आइस्क्रीमवर सोने शिंपडले जाते. पण हे आइस्क्रीम भारतात नाही तर दुबईत मिळते.

किंमत किती आहे ? 

दुबई हे एक अतुलनीय शहर आहे आणि तिथल्या इतर सर्व गोष्टींप्रमाणे, तेथील पदार्थानी देखील जगाला आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच दुबईतील एका कॅफेने सोन्याचे मिश्रण करून जगातील सर्वात महागडे आइस्क्रीम बनवल्याचा दावा केला आहे.

Advertisement

दुबईमध्ये उपलब्ध असलेल्या आइस्क्रीमच्या एका स्कूपची किंमत 60,000 रुपये आहे. भारतात सध्या सोने 47-48 हजार रुपये तोळा आहे. म्हणजेच, तुम्ही या आइस्क्रीमच्या किंमतीत सुमारे 12 ग्रॅम सोने खरेदी करू शकता.

या आइस्क्रीमचे नाव काय आहे? 

आम्ही ज्या आइस्क्रीमबद्दल बोलत आहोत त्याचे नाव ब्लॅक डायमंड आहे. लक्झरी आणि रॉयल्टी टच जोडण्यासाठी खाद्यपदार्थांमध्ये सोन्याचा बऱ्याच काळापासून वापर केला जात आहे. विशेष म्हणजे दुबईतील स्कूपी कॅफेने ‘ब्लॅक डायमंड’ आइस्क्रीम विकसित केले आहे जे जगातील सर्वात महागड्या आइस्क्रीमपैकी एक असल्याचा दावा केला जातो. त्यात सोनेही मिसळले आहे आणि त्याची किंमत 60,000 रुपये आहे.

23 कॅरेट सोने यात मिक्स केलेले असते 

हे आइस्क्रीम मेडागास्कर व्हॅनिला आणि इटालियन ब्लॅक ट्रफल्स सारख्या दुर्मिळ घटकांनी तयार केले आहे. आइस्क्रीमला लक्झरी टच देण्यासाठी खाण्यायोग्य 23-कॅरेट गोल्डचे फ्लेक्स इराणी केशरमध्ये मिसळला जातो.

Advertisement

6 वर्षांपूर्वी लाँच केले 

2015 मध्ये कॅफेने ‘ब्लॅक डायमंड’ आइस्क्रीम लाँच केले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार, हे आइस्क्रीम खाण्यासाठी सर्वात महाग नाही. जगातील सर्वात महागडे आइस्क्रीम म्हणजे फ्रोजन हॉट चॉकलेट, जे न्यूयॉर्क शहरात आढळते. या आइस्क्रीमची किंमत सुमारे $ 25,000 (18 लाख रुपये) आहे.

 

Advertisement
Leave a comment