मुंबई : बँका (Bank) आपल्याला होम लोनसाठी (Home Lone) पैसे देतात. व आपण त्या पैश्यावर स्वतःसाठी घर निर्माण करतो. मात्र याच बँका स्वतः भाड्याच्या ऑफिसमध्ये (Office) असतात.

या बँका ग्राहकांना घर खरेदीसाठी मदत करतात तर मग स्वतः भाड्याच्या जागेवर का असतात हे ऐकायलाही वेगळेच वाटते, त्यामुळे असा प्रश्न सर्वाना पडणे साहजिकच आहे.

परंतु या बँकांची एक जुनी परंपरा आहे. यामुळे त्यांना त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. सुरूवातीला जेव्हा बँका सुरू झाल्या तेव्हा त्या भाड्याच्या जागेवरच सुरू करण्यात आल्या होत्या, तीच परंपरा बँकांनी अजून पण कायम ठेवली आहे.

Advertisement

याबाबत अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बँकांनी याबाबत पॉलिसीमध्ये (Policy) बदल करून नवीन पॉलिसी बनवणे गरजेचे आहे. तसेच बँकांचे ऑफिस भाड्याच्या ठिकाणी सुरू करणे गरजेचे नाही.

शक्यतो खेडेगावांमध्ये शाळा व ग्रामपंचायत या ठिकाणी भरपूर जागा असते. त्यामुळे गावांमध्ये ग्रामपंचायत आणि अंगणवाडीच्या जागेत बँका आपले कार्यालय सुरू ठेवू शकतात.

दरम्यान, फक्त काही प्रमाणात मोठ्या किंवा रिझनल ऑफिस ब्रांचच्या (Regional Office Branch) बँका या स्वतःच्या जागेत असतात. त्यामुळे साहजिकच अनकदा असा प्रश्न पडतो की, दुसऱ्यांच्या घरांना होम लोन देणाऱ्या बँकांकडे मात्र स्वतःच हक्काची का नाही.

Advertisement