पुणे : देशात ओमिक्रॉनची (Omicron) रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच कोरोना (Corona Virus) रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक (Shocking) माहिती समोर आली आहे.

पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे एका ५२ वर्षीय नागरिकाचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. देशातील आणि राज्यातील हा ओमिक्रॉनचा पहिला बळी (Omicron’s first death) गेला आहे.

हा रुग्ण पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) उपचार घेत होता. या रुग्णाचा २८ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. तर त्याची ओमिक्रॉन टेस्ट काल दि. ३० रोजी पॉझिटिव्ह (Omicron Test) आली आहे.

Advertisement

पिंपरी चिंचवड शहरात ३ ओमिक्रॉनचे 3 नवे रुग्ण (Omicron Patients) सापडले होते. या तीन रुग्णांपैकी १ रुग्ण हा नायजेरियातून (Nigeria) आला आहे. बाकीचे २ हे त्याचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.

नायजेरियातून आलेल्या रुग्णाचा २८ तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने (Omicron Test) वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर त्याचा कोरोना अहवाल काल आला आहे. त्यामध्ये त्याला ओमिक्रॉनची लागण (Omicron infection) झाल्याचे समोर आहे.

तर त्याचे २ नातेवाईक रुग्ण भुसावळमध्ये (Bhusaval) उपचार घेत आहेत. या तीन रुग्णांपैकी २ महिला आणि १ पुरुषाचा समावेश होता. ओमिक्रॉनचा धोका कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

पण धोका कमी असला तरी महाराष्ट्रातील पुण्यात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. प्रशासनाने ३१ डिसेंबर साठी नियमावली जाहीर केली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. ओमिक्रॉनचा पहिला बळी गेल्यामुळे जिल्हा आणि राज्य प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे.

Advertisement