पुणे : ओमिक्रॉनची रुग्णसंख्या (Omicron Patients) दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच कोरोनाचे रुग्णदेखील (Corona Patients) वाढत आहेत.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने (District Administration) ओमिक्रॉनची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात (Pune District) कठोर निर्बंध (Strict restrictions) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ओमिक्रॉनची लक्षणे (Omicron Symptoms) सौम्य असली तरी त्याच्या संसर्गाचा (Infection) वेग हा अधिक आहे.

Advertisement

तसेच पुणे शहर (Pune city) आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढीचा वेगही दुप्पट झाला आहे. खबरदारी म्हणून कठोर निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे.

नववर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाचा वाढीचा वेग जास्त वाढल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्वच ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत.

काय आहेत जिल्ह्यातील निर्बंध…

Advertisement

१. जिल्ह्याच्या कोणत्याच पर्यटन स्थळी तसेच मोकळी मैदाने येथे गर्दी करू नये.

२. खुल्या किंवा बंदिस्त जागेमध्ये विवाह व त्याच्या अनुषंगाने इतर कार्यक्रम समारंभ प्रसंगी उपस्थितांची अधिकतम मर्यादा ५० राहील याची काळजी घ्यावी.

३. सामाजिक,सांस्कृतिक राजकीय किंवा धार्मिक समारंभाप्रसंगी खोल्या तो बंदिस्त जागेमध्ये उपस्थितांची मर्यादा ५० असावी.

Advertisement

४. अंत्यविधीच्या कार्यक्रमात उपस्थितांची संख्या 20 पेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी घ्यावी.

५. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

Advertisement