ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

तलाठ्यासह एकाला लाच घेताना अटक

सातबारा उताऱ्यावर भोगवटा वर्ग करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना दौंड तालुक्यातील दहिटणे येथील तलाठ्याला आणि त्याच्या सहका-याला एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही आहेत आरोपींची नावे

तलाठी कुंडलिक नामदेव केंद्रे (वय ३६) आणि शंकर दत्तू टुलै (रा. मिळवली, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी लोकसेवक केंद्रे यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर भोगवटा वर्ग करण्यासाठी अर्ज केला होता.

त्या अर्जानुसार कार्यवाही करण्यासाठी केंद्रे यानी तक्रारदार यांच्याकडे ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

लाच मागितल्याचे निष्पन्न

या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. त्या वेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी केंद्रे व टुले अशा दोघांना ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

 

You might also like
2 li