पुणे: दुचाकीस्वार महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्याने महिलेच्या हातातील एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी लांबविल्याची घटना नुकतीच बाजीराव रस्त्यावरील शनिपार मंदिराजवळ घडली.

याबाबत एका महिलेने बुधवारी (दि. २२) विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. ही महिला दहा दिवसांपूर्वी शनिपार परिसरात खरेदीसाठी गेली होती. त्यांनी एका दुकानासमोर दुचाकी लावली होती.

काम आटोपून त्या पुन्हा दुचाकीजवळ आल्या. त्यांच्या गाडीशेजारी दुसरी दुचाकी लावण्यात आली होती. त्या वेळी चोरट्याने दुचाकी काढून देण्याचा बहाणा करून

Advertisement

त्याने महिलेच्या नकळत हातातील एक लाख पाच हजारांची सोन्याची बांगडी लांबवली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.