पुणे – एसटी कर्मचाऱ्यांसाठी (Maharashtra State Transport Employee) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देणार असून तशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. नुकतंच एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी तश्या सूचना दिल्या असून, लवकरच या सर्व कामगारांना (ST Employee) महागाईचा भत्ता मिळणार आहे.

स्वतः हा एकनाथ शिंदे यांनी परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह यांना फोनवरून कर्मचाऱ्यांचे डीए देण्याचे आदेश देण्यात आलेत.

दरम्यान, महागाई भत्ता देण्याचं (ST Employee) आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. त्यामुळे ऐन गणेश गणेशोत्सवात हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलास मिळणार हे नक्की.

यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील नेते अनिल परब यांनी 28 ऑक्टोबर 2021 रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. सध्याच्या घडीला सरकारप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के इतका महागाई भत्ता दिला जातो.

28 ऑगस्ट रोजी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ करत एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा केली होती.

तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली गेली होती. मात्र, यावेळी एसटीचं विलिनीकरण केलं जावं, ही प्रमुख मागणी एसटी कामगार संघटनांनी केली होती.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप…

एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 109 दिवस विलीनीकरणासाठी संप पुकारला होता.

सुरूवातील आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या आंदोनवार तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली.

मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. आणि शेवटी यावर तोडगा निघाला होता.