ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

मध्यस्थ आणि व्यापा-यांनी पाडले कांद्याचे भाव

सध्या देशातील ब-यांच भागात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, यामागे काही मध्यस्थ आणि मोठ्या मंडईच्या व्यापाऱ्यांचा हात आहे. ठरवून भाव पाडण्यात आल्याचा आरोप आहे.

कांद्याला १४०० रुपये भाव

किरकोळ बाजारात कांदा खरेदी करायला गेलो, तर त्याचा दर 40 रुपये प्रतिकिलो इतका आहे.

जे शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून सहा महिने शेतात राबून कांद्याचे उत्पन्न घेतात, त्यांना प्रति क्विंटल केवळ 1400 रुपये इतका दर मिळतो. उर्वरित पैसे हे दोन चार व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांकडे जातात.

भाव पाडण्यामागे होर्डरची रणनीती

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक होल्डर्सलाही कांद्याच्या किंमती खाली यावे असेच वाटत असते. कारण किंमती खाली आल्या तर ते अधिक कांदा खरेदी करतात.

तर नंतर त्याची किंमत वाढली की तो विकून मोठा नफा कमवतात ही अनेक होर्डरची रणनीती असते. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर खाली येत आहेत, त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे.

आवक वाढण्यामागचे कारण काय?

 बहुतेक मंडईंमध्ये कांद्याची आवक सामान्य असते. काही मंडळांमध्ये आवक नक्कीच वाढली आहे, पण त्यामागे एक कारण आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव कांदा मार्केटमध्ये जवळपास एक लाख गोणी कांद्याची आवक झाली, तर साधारणत: येथे फक्त 40-50 हजार गोणी येतात.

कोरोनामुळे सहा दिवसांऐवजी येथे फक्त दोन  दिवस लिलाव होत आहे. ज्या दिवशी आवक जास्त झाली त्यादिवशी व्यापाऱ्यांनी हा दर कमी करून 1400 रुपये प्रतिक्विंटल केला. तर त्याच दिवशी सोलापूरच्या बाजारात 2000 रुपयांचा दर होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

You might also like
2 li