सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. या परीक्षा १२ तारखेपासून सुरू होत असून, बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षेला सहा लाख विद्यार्थी बसणार आहेत.

२८४ अभ्यासक्रमासाठी परीक्षा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र व इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी चार हजार १९५ विषयांसाठी ऑनलाईन परीक्षा होत आहे. या परीक्षेआधी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) होणार आहे.

आठ ते दहा जुलैदरम्यान ही परीक्षा होईल. १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं. या परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

Advertisement

याप्रमाणे साठ प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. यातील पन्नास प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण तीस प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.

गैरप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना

याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडलाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, “ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करू नये यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर नमुन्यादाखल काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येईल.

Advertisement

यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.” या परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

तीन दिवस अर्ज करता येणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षा अर्ज भरता आले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना १२, १३ व १४ जुलै रोजी परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. त्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येईल, अशी माहिती काकडे यांनी दिली.

तांत्रिक दोषावर काय करणार?

परीक्षेत लॉग इन न होणे, लॉग आउट होणे, इंग्रजी/ मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे, परीक्षार्थींना परीक्षेच्या वेळी कोविड विषाणू बाधा झालेली असणे, विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी अशा परीक्षा एकाच दिवशी येणे अशी कारणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करता येणार आहे; मात्र प्रत्येक तक्रारीची छाननी करण्यात येईल. अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे हॉल तिकीट किंवा इतर पुरावा देणे गरजेचे असणार आहे.

Advertisement