मुंबई – करोनानंतर यावर्षी सर्वत्र दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाचं मोठं आयोजन पाहायला मिळालं असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. यंदा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव साजरा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दहीहंडीचा समावेश खेळामध्ये केला आहे. तसेच, शिंदे सरकारने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास दहा लाखांचा विमा कवच देण्याची घोषणा सुद्धा केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

तसेच, राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी (Dahi Handi) स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या धोरणावर सडकून टीका केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“गोविंदा आरक्षणाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत असून त्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीला (ncp) दिला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला हा निर्णय योग्य वाटतोय. दहीहंडीला सरकारने खेळाचा दर्जा दिलाय. ते लोकांमध्ये ऊर्जा तयार करण्याचे काम करत आहे.

दहीहंडी सांस्कृतिक खेळ असून गोविंदांना या माध्यमातून संरक्षण मिळेल”. असं चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यावेळी म्हणाले आहेत.