मुंबई: कोरोनाचा एक डोस घेतला, की त्यानंतर दुसरा डोस घेण्याकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा डोस वेळेवर मिळत नाही. या दोन्हीही गोष्टी घातक आहे.

त्याचे कारण कोरोनापासून बचाव करायचा असेल, तर कोरोनाचे दोनही डोस घेणे आवश्यक असल्याचे सिद्ध झाले आहे.

पहिल्या डोसनंतर फिरवतात पाठ

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे. काहीजण पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाचे दोन डोस घेण्याचे फायदे आहेत.

Advertisement

त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे.

दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना बाधा

कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा परिणाम होतो; पण दुसऱ्या डोसचा त्याहीपेक्षा जास्त फायदा होतो. मुंबई महापालिकेने एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईतील दोन लाख नव्वद हजार कोरोना बाधितांचे सर्वेक्षण केले.

दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली, तर पहिला डोस घेतलेल्या दहा हजार पाचशे जण कोविडची बाधा झाली.

Advertisement

लसीचा चांगला परिणाम

मुंबई महापालिकेच्या वॉर रुम्सनी डाटाचे एकत्रीकरण केले. एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईत एकूण तीन लाख ९५ हजार नागरिकांना कोविडची बाधा झाली. यात दुसऱ्या लाटेतील रुग्ण जास्त होते.

या वॉर रुम्सना तीन लाख ९५ हजार कोविड बाधितांपैकी गृह विलगीकरणात असलेल्या दोन लाख नव्वद हजार कोविड बाधितांशी संपर्क साधता आला. “‘गोळा केलेल्या माहितीवरुन, बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोविडचं गंभीर इन्फेक्शन रोखण्यामध्ये लसी प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.

रुग्णालयात असलेल्या पेशंटची माहिती मिळाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. या डाटाचं एकत्रीकरण सुरु आहे” असं अधिकाऱ्याने सांगितलं.

Advertisement