मुंबई – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री ‘वाणी कपूर’ (Vaani Kapoor) आणि ‘संजय दत्त’ (Sanjay Dutt) सोबत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर (Ranbir Kapoor) पहिल्यांदाच एका डाकूची भूमिका साकारत आहे. ‘शमशेरा’ची (Shamshera) रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतशी चित्रपटाच्या टीमने त्याचे प्रमोशन सुरू केले आहे.

अलीकडेच चित्रपटाचे मुख्य कलाकार रणबीर आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) लोकांच्या गर्दीत अडकले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओ मध्ये रणबीर कपूर आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) गर्दीमध्ये दिसत आहेत. गर्दीमुळे वाणी एका कोपऱ्यात उभी असते, तेव्हा रणबीर तिथे येतो आणि तिला बाहेर घेऊन जातो.

सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनेत्याच्या काळजीवाहू स्वभावाचे कौतुक केले आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वाणीने एक सुंदर बेज रंगाचा ट्यूब ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.

वाणीचा (Vaani Kapoor) हा हॉट अवतार सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. या ड्रेसमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमर्स देखील दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रणबीर शेवटचा 2018 साली ‘संजू’ चित्रपटात दिसला होता. चार वर्षांनंतर त्याचा ‘शमशेरा’ हा चित्रपट 22 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

यावर्षी रणबीर अयान मुखर्जीच्या ‘बाह्मास्त्र’ चित्रपटात पत्नी आलिया भट्टसोबत दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.