Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महिलांसाठीही राज्यात खुली कारागृहे उभारणार

राज्यात पुरुषांसाठी खुली कारागृहे आहेत. त्या अनुषंगाने महिलांसाठी खुली कारागृहे निर्माण करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

कारागृह विभागाचा आढावा

कारागृह विभागाचा आढावा घेण्यासाठी वळसे पाटील यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. या वेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक संजय पांडे, अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा कारागृह अधीक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित होते.

राज्यात महिलांसाठी नाही एकही खुले कारागृह

ज्यांची शिक्षा पूर्ण होत आली आहे आणि ज्यांचे वागणे सुधारले आहे, अशा कैद्यांच्या अंगभूत गुणांना खुल्या कारागृहात काम दिले जाते. त्यांच्याकडून उत्पादने तयार करून घेऊन ती बाजारात विकली जातात.

Advertisement

उत्पन्नाचा काही वाटा कैद्यांना दिला जातो; परंतु राज्यात महिलांसाठी असे एकही कारागृह नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी वळसे पाटील यांनी महिलांसाठी राज्यात खुले कारागृह बांधण्याची घोषणा केली.

का बांधणार खुले कारागृह

अनवधानाने एखादे कृत्य घडते. त्यातून न्यायालयानं शिक्षा दिली, तर महिलांना ती पूर्ण करावी लागते. त्यांचे वर्तन सुधारले, तर शिक्षेत काही प्रमाणात सूट दिली जाते;परंतु महिलांना कैद्यांचे जीणे शिक्षा पूर्ण होईपर्यंत जगावेच लागते.

पुरुष कैद्यांचे पलायन करण्याचे प्रमाण जास्त असते. त्या तुलनेत महिला कैद्यांचे प्रमाण फारच कमी असते. या पार्श्वभूमीवर महिला कैद्यांसाठी खुले कारागृह उभारण्याचा निर्णय राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतला आहे.

Advertisement

मुख्यालयाची नवीन इमारत बांधणार

कारागृह विभागाचे सध्याचे मुख्यालय जुन्या मध्यवती इमारतीमध्ये आहे. तेथून हलवून येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणा-या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येईल, यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

मुंबईत कारागृहाची बहुमजली इमारत

मुंबई येथे बहुमजली कारागृह उभारणे, महिला कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करणे तसेच बंद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रायलसाठी हजर करण्यासाठी सीआरपीमध्ये दुरुस्ती करुन जास्तीत जास्त प्रमाणात व्हीसीचा वापर करून कैद्यांचा वेळ वाचेल. न्याय प्रक्रिया जलद होईल, यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Advertisement
Leave a comment