मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही विरोधकांना उत्तर दिले आहे.
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेंनंतर भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये चांगलेच आरोप सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्यावर बाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi) जेव्हा तयार झाली, तेव्हा संजय राऊत प्रमुख होते. त्यांना टार्गेट करणे योग्य नाही असेही शिंदे म्हणाले आहेत.
शिवसेना घाबरलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणा माध्यमातून असा त्रास योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होती, म्हणून मी तिकडे होतो.
कॉंग्रसमध्ये (Congress) कुठेही नाराजी नाही. पक्षातील कोणीही नेतेमंडळी नाराज नाहीत. काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक आहे.
त्यामुळे विरोधकांनी उगाच चर्चांना उधाण आणू नये असा इशाराही चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) एकनाथ शिंदेनी दिला आहे.
गेली अनेकवर्ष प्रतिक्षेत असलेल्या या जेट्टीचे लोकापर्ण होत आहे. ही एक चांगली सुरूवात आहे. इतर देशातमध्येही अशा प्रकारे वॉटर टॅक्सी वापरली जाते. नवी मुंबई ते भाऊचा धक्का असा आपला पहिला टप्पा सुरू होत आहे.
तिकिटाचे दर किफायतशीर आहेत. भविष्यात नागरिकांच्या ज्या सूचना येतील त्यानुसार बदल केले जातील. आधी प्रवास तरी सुरू होऊ द्या असे शिंदे म्हणाले आहेत.