मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून राज्यात चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांचे टीकास्त्र काही थांबताना दिसत नाही.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. तसेच त्यांनी भाजप (BJP)  नेत्यांना इशारा देखील दिला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या यांची लोक धिंड काढतील, सोमय्या यांच्या बाजूने बोलणाऱ्या भाजप नेत्यांनी या प्रकरणात मध्ये पडू नये अथवा तुम्हाला उघडे करू असा सज्जड इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Advertisement

मुंबई आयआयटी जवळील पेरूबाग येथील पुर्नवसन प्रकल्पात किरीट सोमय्या यांनी ४३३ बोगस लोकांना प्रकल्पात घुसवले.

ही सर्व बोगस लाभार्थी किरीट सोमय्या यांची एजंट होती. प्रत्येकाकडून किमान २५ लाख रुपये सोमय्या यांनी घेतले असल्याचंही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

या पुर्नवसन प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांना स्थानिक रहिवासी दाखवण्यासाठी बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांचा आधार घेण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Advertisement

या पुर्नवसन प्रकल्पाच्या घोटाळ्यातील कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही या प्रकरणाची कागदपत्रे देणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.