Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

फिव्हर क्लिनिक सुरू करण्याचे ‘या’ मंत्र्यांचे आदेश

“पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. कोविडचा धोका तर कायम आहे. यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरू करा.

लसीकरण केंद्राच्या ठिकाणीदेखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे.

गृहनिर्माण संस्थांमधूनदेखील याविषयी जनजागृती करा,”असे आदेश राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

Advertisement

साथीच्या आजारांचा विचार करा

मुसळधार पाऊस साचलेलं पाणी आणि यानंतर उद्भवणारे इतर साथीचे आजार यांचा विचार करून मुंबई फिव्हर क्लिनिक्स सुरू करण्याचे आदेश दिले.

मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला.

या बैठकीत आदित्य यांनी हे आदेश दिले. यावेळी बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख हेही उपस्थित होते.

Advertisement

हॉटलाईन सुरू करा

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असं सांगत महत्वाच्या सूचना केल्या.

ते म्हणाले, “मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत; मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुतीकरणासंदर्भात पावले उचलता येतील का ते पाहावे.

रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून हॉटलाईन सुरू करावी,” असं त्यांनी सांगितले.

Advertisement

पाणीपुरवठा सुरळीत ठेवा

पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील तीन दिवस महत्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी असे सांगितले.

वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असंही ते म्हणाले.

पालिकेचे कर्मचारी 24 तास ड्युटीवर

मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले, “काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्या काही तासांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला.

या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्य एक घटना मिळून एकूण 27 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्या स्थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्यात आले आहे.

 

Advertisement
Leave a comment