Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

दहावीच्या निकालातील गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाच्या दिवशी संकेतस्थळ कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची चटाैकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. त्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली आहे.

दहावीच्या निकालात उद्भवलेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. संकेतस्थळ डाऊन झाल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली आहे.

पाच सदस्यीय समिती संकेतस्थळाची जबाबदारी कोणाची आहे ? हे निश्चित करेल, त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं काढले आहेत.

Advertisement

विद्यार्थ्यांची एवढी मोठी संख्या आहे हे माहीत असताना तांत्रिक नियोजन केलं होतं का, असा सवाल राज्य सरकारने विचारला आहे.

15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना एक वाजता उपलब्ध होणार होता. निकाल जाहीर झाल्यानंतर सहा तासांहून अधिक वेळ संकेतस्थळ क्रॅश झालं होतं.

राज्य सरकारने अहवाल सादर करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण मंडळाला आदेश आहेत. गोंधळाची चौकशी होऊन कारवाई कोणावर केली जाणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

Advertisement

वेबसाईट डाऊन का झाल्या ?

एक वाजता निकाल पाहण्यासाठी खुला केल्यावर सर्व्हरवर लोड आला. फायर वॉलवर गर्दी झाली. त्यामुळं वेबसाईट हँग झाली. 60 हजार निकाल डाऊनलोड झाले.

दीड लाख लोक आता वेबसाईटवर आहेत. दोन नव्या लिंक तयार केल्या आहेत. वेबसाईट सुस्थितीत यायला थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.

वेबसाईट डाऊनला जबाबदार कोण ?

सर्व्हरवर लोड आला असं बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं. पण तांत्रिकदृष्ट्या लोड येणार हे साहजिक होतं. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 16 लाखांपेक्षा जास्त होती.

Advertisement

त्यामुळे वेबसाईटवर निकाल लागण्यास सुरु झाल्यानंतर 16 लाख लोक एकत्र वेबसाईटवर येणे स्वाभाविक आहे. त्यासाठी बोर्डाने सर्व्हरची क्षमता वाढवून ठेवणे आवश्यक होतं.

मात्र त्याची तयारी बोर्डाने केलीच नाही हे यावरुन स्पष्ट होतंय. राज्यातील दहावीचे 16 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक दुपारी 1 वाजल्यापासून ताटकळत आहेत. या सर्व गैरप्रकाराला कोण जबाबदार?

Advertisement
Leave a comment