Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मराठा आरक्षणाचा आता केंद्रानेच वटहुकूम काढावाः खा. संभाजीराजे

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मागास वर्गीय आयोग तयार करून आपल्याला परत एकदा सगळ्या गोष्टी करेक्ट कराव्या लागतील.

राज्यपाल राष्ट्रपतींच्या माध्यमातून आरक्षण पुन्हा एकदा मिळवता येऊ शकतं. आता केंद्र सरकारने वटहुकूम काढावा हाच पर्याय उरलेला आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

आरक्षणाचे भविष्य केंद्राच्या हाती

खासदार संभाजीराजे यांनी संवाद यात्रेला सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने एसीबीसी प्रवर्ग संदर्भात महत्त्वाचा आदेश दिला आहे. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणाचे भवितव्य आता केंद्र सरकारच्या हातात आहे. मूक आंदोलन तूर्तास बंद केले आहे केले; पण ते पूर्णपणे मागे घेतलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

एसईबीसीचा अधिकार राज्यांना नाही

केंद्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा 102 व्या घटना दुरुस्तीवर बोट ठेवण्यात आले आहे. एसईबीसीचे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा अधोरेखित केले आहे.

आता पुन्हा याचिका दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येत्या पंधरा दिवसात अनेक ठिकाणी बैठक घेणार असून त्याचा चार दिवसांचा संवाद दौरा सुरू केला आहे. जामखेड,बीड अशा अनेक ठिकाणी भेटी देणार आहोत.

उद्या औरंगाबादपासून संभाजीनगरपर्यंत दौरा असणार आहे. त्यानंतर अमरावती पासून झालेला दौरा हा नागपूरला जाऊन संपेल, अशी माहिती संभाजी राजेयांनी दिली आहे.

आता जबाबदारी केंद्राची

338 ब च्या माध्यमातून आता मागास वर्गीय आयोग तयार करावा लागेल. गायकवाड अहवालातील त्रुटी भरून काढाव्या लागतील. अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रपती यांच्याकडे जावं लागेल.

महाराष्ट्रात फुल प्रूफ कायदा केला नाही, का यावर मतमतांतरे आता होतील. केंद्र सरकारला आता लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल. राज्य फक्त आता शिफारस करू शकेल. आता केंद्राची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

 

Leave a comment