मुंबई :- ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने आपल्या द वन या कलर कॉस्मेटिक ब्रँडचे नवे आणि विकसित व्हर्जन बाजारात आणले आहे. ज्या महिला त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आघाडीवर आपले व्यक्तीमत्त्व आणि सामर्थ्य व्यक्त करतात, त्यांच्यासाठीच हा खास प्रोग्रेसिव्ह ब्रँड तयार करण्यात आला आहे. द वनमध्ये ऑन-ट्रेंड संकल्पना, अत्याधुनिक पॅकेजिंग आणि डिझाइनचा पोर्टफोलिओ आहे. हाय-टेक लाँग विअर फॉर्मुलेशन्समुळे प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारा लूक मिळतो.

जगातील नूतनाविष्कारांची राजधानी समजल्या जाणाऱ्या स्टॉकहोममध्ये डिझाइन केलेली ही श्रेणी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आहे. तसेच अपग्रेडेड सुपरचार्ज फॉम्युलेशनद्वारे विकसित केलेली आहे. या अनावरणाचा एक भाग म्हणून, ओरिफ्लेमने नव्या उत्पादनांची श्रेणी लाँच केली आहे. यात द वन कलर अनलिमिटेड अल्ट्रा फिक्स लिपस्टिक, द वन कलर अनलिमिटेड आय शॅडो, द वन आयलायनर स्टायलो, द वन अल्टीमेट जेल लॅकर अँड टॉप कोट तसेच द वन कलर स्टायलिस्ट अल्टीमेट लिप लायनर यांचा समावेश आहे.

द वन कलर अल्टीमेट अल्ट्रा फिक्स लिपस्टिक हे ओरिफ्लेमचे नवे सेन्सेशनल मॅट फिनिश लिपस्टिक असून यात ओठांवर ९९% स्टेइंग पॉवर कलर फिक्सेशन राहते. हे जादुई लिपस्टिक परफेक्ट शेडमध्ये ओठावर लावल्यास, फिल्म बनवणारी नेट तेथील जागेत रंग भरते आणि यात जल-प्रतिरोधक क्षमताही असते. त्यानंतर सॉफ्ट मॅट पावडरद्वारे मऊ पोत आणि अधिक डाग घालवण्याची क्षमता येते. डाग किंवा व्रण नसल्याने, लिपस्टिक अल्ट्रा-इंटेन्स पिगमेंटेशन व डेफिनिशनद्वारे ८ तासांपर्यंत टिकून राहते.

Advertisement

द वन कलर अनलिमिटेड आय शॅडो स्टिक्स हे ४ ट्रेंडी शेड्समध्ये सर्वाधिक समृद्ध रंगद्रव्य आहेत. आयशॅडोमध्ये दीर्घकाळ टिकणारे, विश्वासू आणि जल प्रतिरोधक क्षमता असलेले घटक समाविष्ट आहेत. नवे तंत्रज्ञान- फिल्म फॉर्मर हा पॉलिमर रिइन्फोर्स्ड फॉर्म्युला असून रंगद्रव्य योग्य ठिकाणी राहण्याची ते हमी घेतात. तसेच तुमच्या स्वप्नातील क्रीज-रेझिस्टंट फिनिश देतात.

द वन आय लायनर स्टायलोसह अकल्पनीय प्रभावी तंतोतंतपणाची तयारी करा. प्रत्येक वापरावेळी आपल्याला हवा तसा लुक देण्यासाठी एक तीव्र रंगद्रव्य आणि उत्तम टोकाच्या टिप पेनसह हे दीर्घकाळ टिकाणारे लिक्विड आयलायनर येते.

Advertisement