पुणे : कर्नाटकातील (Karnatak) हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात (Maharashatra) उमटत आहेत. पुण्यामध्ये (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Nationalist Congress Party ) वतीने गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यावर (Mahatma Fule Wada)  हिजाब बंदीविरोधात मुस्लिम महिला व इतर महिला पारंपरिक वेशभूषेत आंदोलन करत आहेत.

कर्नाटकमध्ये मुस्लीम मुलींना कॉलेजमध्ये हिजाब वापरल्याने कॉलेजमध्ये येण्यास प्रवेशबंदी केली होती. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवत महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध केला आहे. या ठिकाणी आंदोलन करत कर्नाटकमधील भाजप सरकारचाही निषेध नोंदवला आहे.

कर्नाटकमध्ये हिजाब घालणाऱ्या युवतींचा विरोध म्हणून काही संघटना भगवी शाल अंगावर घालून कॉलेजमध्ये (College) येण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

याबरोबर हिजाब घालून महाविद्यालयात आलेल्या तरुणीला अडवण्याची प्रयत्नही करण्यात येत आहे. यावेळी ‘जय श्रीराम च्या घोषणात देत , भगवे झेंडे हात घेऊन तरुणांच्या जमावाने गोंधळ घातला होता.

हिजाबचा वाद हा 23 दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. शिक्षणमंत्री बी सी नागेश (Education Minister B. C. Nagesh) यांनी सांगितले की, हा वाद सुरु होण्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली हिजाब घालत नव्हत्या. हिजाब घातल्यानंतर संबंधित महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला होता.

तसेच याविरोधात तरुणींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. व यामध्ये त्यांनी आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारलाय. आमच्या धार्मिक आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, अशी याचिका त्यांनी केली आहे.

Advertisement