सोलापूर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची २०१९ साली महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता आली आहे. पण अनेकदा आघाडीत बिघाडी झाल्याचे पहिले असेल. आता माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP MLA) जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी महाविकास आघाडी बाबत सुचक वक्तव्य केले आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अगोदरच राजकीय धुरळा उडताना पाहायला मिळत आहे.

आमदार बबन शिंदे म्हणाले की, यंदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली आणि पक्षश्रेष्ठींनी तसे आदेश दिले, तर स्थानिक पातळीवर युती होऊ शकते.

Advertisement

जर युती झालीच नाही तर आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवणार असा इशाराजनक संकेत बबनदादा शिंदे यांनी दिला आहे. शिंदेच्या या वक्तव्यामुळे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, माढा पंचायत समिती कार्यालयाच्या जवळपास 4 कोटी रुपयांच्या निधीतून उभा केलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

तसेच माजी आमदार आणि सहकार महर्षी कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभास राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निमंत्रण दिले आहे असेही बबन शिंदे यांनी सांगितले आहे.

Advertisement