मुंबईः तीन महिन्याच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार करून, तिचा खून केल्यानंतर मृतदेह खाडीनजीक फेकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तृतीयपंथीय आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रथेचा गैरफायदा

कुणालाही घरात अपत्य झाले, तर तृतीयपंथीयांना बक्षिसी दिली जाते. साडी दिली जाते. ही प्रथा केवळ ग्रामीण भागातच आहे, असे नाही, तर मुंबईसारख्या शहरांत आहे. या प्रथेमुळे तृतीयपंथीयांचे फावते. ते कुठल्याही थराला जातात.

अशाच एका गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली. या कुटुंबाकडे जाऊन तृतीयपंथीयांनी ११०० रुपये, साडीची मागणी केली. या गरीब कुटुंबाला ते शक्य नव्हते.

Advertisement

हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार

घरात मुलगी होऊनही बक्षीस दिले नाही, साडीचोळी दिली नाही, म्हणून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागले आहे. हत्येपूर्वी तृतीयपंथीयांनी तिच्यावर लैगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

तृतीयपंथीयांनी शिव्याशाप देऊन तिथून काढता पाय घेतला; परंतु मध्यरात्रीनंतर येऊन त्या तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा मृतदेह खाडीशेजारी पुरला. आता या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला.

चार दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. कफ परेड पोलिसांनी एक तृतीयपंथी आणि त्याच्या साथीदार मित्राला अटक केली आहे. तृतीयपंथी कन्हैया चौगुले आणि त्याचा साथीदार सोनू काळे अशी त्यांची नावे आहेत.

Advertisement

पैशावरून झाला होता वाद

कफ परेडमध्ये राहणाऱ्या बालिकेच्या पालकांकडे तृतीयपंथी प्रथेनुसार पैसे, साडी आणि नारळ मागण्यास गेला. मुलीच्या बारश्याच्या वेळी हे सर्व मानपानासह देतो, असे मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मात्र त्याला लगेचच पैसे हवे होते. यावरून बालिकेच्या कुटुंबीयांसोबत त्याने भांडण केले आणि त्याचा राग बालिकेवर काढला.

पैसे कमवण्यासाठी तृतीयपंथी

दरम्यान, बालिकेच्या घरच्यांनी कन्हैया हा तृतीयपंथीय नसून पुरुष असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत त्याच्या वडिलांना विचारले असता त्यांनीही तो पुरुषच असून गेल्या काही वर्षांपासून तृतीयपंथींच्या सहवासात राहत आहे.

Advertisement

पैसे कमवायचा सोपा मार्ग म्हणून तो तृतीयपंथी बनल्याचे म्हटले जात आहे. गुन्हा दाखल करताना तो तृतीयपंथी आहे असे नमूद करण्यात आले आहे; मात्र याबाबतही वैद्यकीय सल्ला घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.