नवी दिल्ली : कर्नाटकातील (Karnataka) हिजाब (Hijab) प्रकरणावरून एआयएमआयएमी (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी बुरखा-हिजाब घालणाऱ्यांकडे भाजपने (BJP) मते मागू नयेत अशी टीका केंद्र सरकारवर (central government) केली आहे.

हिजाब घटनेनंतर ओवैसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘बुरखा-हिजाब घालणाऱ्यांकडे भाजपने मते मागू नयेत’ तसेच बुरखा आणि हिजाब हे इस्लामचे अत्यावश्यक अंग आहेत.

मुस्लिम मुलींना हिजाब घातल्याबद्दल शिक्षणापासून का रोखले जाते? सरकारचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा आहे, मग मुस्लिम मुलींना शिक्षणापासून रोखणे योग्य नाही.

Advertisement

दरम्यान देशात सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा राडा सुरु असल्याचे दिसत आहे. कारण कर्नाटकच्या कॉलेजमधील (College) एका व्हिडीओने (Video) देशात नवीन वादळ निर्माण केले असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत एख तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येत होता.

या जमावामधील तरुण या तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर ही तरुणीदेखील त्यांना तेवढ्याच धाडसाने उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देताना पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

या सर्व घटनेचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमटत असून मुस्लिम बांधव एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. दरम्यान, हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्जही दाखल करण्यात आला आहे.

Advertisement