पुणे : भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) हे महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) सारखे टीका करत असतात. पुण्यात (Pune) बोलताना ते म्हणाले आज मी कोणत्याही विषयावर भाष्य करणार नाही.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राज्यात अनेक प्रकारच्या लोककला जोपासल्या जातात. या कला विविधतेने नटलेल्या आहेत त्यांचे संवर्धन केले पाहिजे.

गावगाड्यात अनेक परंपरा संस्कृती आहेत. त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आज त्या जपल्या तरच उद्याच्या पिढीला त्याची माहिती मिळणार आहे. हाच धागा पकडत आम्ही लोकांना एकत्र करण्यासाठी मल्हार महोत्सवाचे (Malhar Festival) आयोजन करत आहोत असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Advertisement

जेजुरीमध्ये (Jejuri) हा समाज एकत्र येत आहे. यात अनेक कलाकार येणार आहेत. यातून आपल्या संस्कृतीची जपणुक होणार आहे, असे भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर बोलताना म्हणाले.

पुण्यात (Pune) बोलताना म्हणाले, मी आज आमदार म्हणून नाही तर बहुजन पुत्र म्हणून आज बोलत आहे. दुसऱ्या कोणत्याही विषयावर आज भाष्य करणार नाही. आपल्या राज्यात गावगाड्यात अनेक परंपरा आणि संस्कृती आहेत.

काही प्रस्थापित संस्कृती या बहुजनाच्या संस्कृती दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुजन समाज हा विखुरलेला आहे. मात्र या सर्वाला फाटा देत जेजुरीमध्ये हा समाज एकत्र येत आहे.

Advertisement

लोकांना एकत्र करण्यासाठी मल्हार महोत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे येथील बालगंधर्व (Balgandharva) येथे आम्ही हा महोत्सव करत आहोत. यात अनेक कलाकार सहभागी होणार असल्याचेही आमदार गोपिचंद पडळकर यांनी सांगितले आहे .