कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालक गमाविलेल्या राज्यातील इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण मिळावे, यासाठी ‘पढेगा भारत’ संस्थेच्या वतीने विनामूल्य ऑनलाइन शिक्षण सुविधेचा प्रारंभ पुण्यात झाला.

चंद्रकांतदादांच्या हस्ते उद्‌घाटन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अमर साबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे पालकत्व घ्या

कोरोनाच्या महामारीत अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाची कल्पना करता येणार नाही, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

समाजाने आणि विविध संस्थांनी अशा विद्यार्थ्यांचे पालकत्व घेणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ‘पढेगा भारत’चा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.’, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

दीडशे तज्ज्ञांचा सहभाग

फिनलॅंड शैक्षणिक धोरण आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून व्हिडिओ साहित्याची निर्मिती केली आहे.

शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेतील आजी-माजी १५० तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी उपक्रमात सहभाग घेतला. बाराशेहून अधिक व्हिडिओ तयार केले आहेत.

Advertisement