ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पालांडे, कुंदन आणि वाझे यांची समोरासमोर होणार चौकशी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे तसेच बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची समोरासमोर चाैकशी होणार आहे.

पुरावे असल्याचा दावा

पालांडे आणि शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. युक्तीवादानंतर पालांडे आणि कुंदन यांच्या ईडी कोठडीत सहा तारखेर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या कथित शंभर कोटी रुपये खंडणी वसुली प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे.

याच प्रकरणात देशमुखांचे दोन्ही स्वीय सहायकांविरोधात ईडीच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. त्याच पुराव्यांच्या आधारे ईडीकडून तपास सुरू असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आहे .

कोर्टात नेमकं काय घडलं?

ईडीच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांनी बाजू मांडली. कोर्टात आजचा युक्तिवाद महत्त्वाचा होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पालांडे आणि शिंदे यांचाही समावेश आहे, असा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांत मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे त्याचा तपास आम्हाला करायचा आहे, असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.

आतापर्यंत या प्रकरणात सीबीआयकडून तपास सुरू होता; मात्र आता ईडीदेखील त्या प्रकरणाचा तपास करणार आहे.

वाझेची कोठडी मागण्याची शक्यता

ईडीने शंभर 100 कोटींचा घोटाळा देखील झाल्याचा अंदाज कोर्टात वर्तवला आहे. त्यामुळे या संदर्भात चौकशी करण्यासाठी ईडी सचिन वाझेची कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.

“आम्हाला सचिन वाझे आणि या आरोपींचा समोरासमोर तपास करायचा आहे. तसेच काही आयपीएस अधिकाऱ्यांनाही तपासासाठी बोलवायचं आहे”, अशी भूमिका ईडीच्या वकिलांनी कोर्टात मांडली.

‘पालांडे आणि शिंदे यांचा गैरव्यवहारात महत्त्वाचा रोल’

जो पैशांचा गैरव्यवहार केला जायचा, त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

You might also like
2 li