Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरला

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते.

हरिभक्तीत दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात; मात्र वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत राज्यातील १० मानाच्या पालख्यांचे एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसमधून पंढरपूरकडे (वाखरी तळापर्यंत) प्रस्थान होणार आहे.

Advertisement

वीस शिवशाही बसमधून पालख्या जाणार

प्रत्येकी दोन याप्रमाणे १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस सज्ज झाल्या आहेत. या पालख्या वाखरी तळापासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहे.

आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.

या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. तो मान एसटी महामंडळाला मिळाल्याबद्दल परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केले आहे.

Advertisement

मंगळवार (दि. १९) रोजी या बसेस पालख्यांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. या बसस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत.

पालख्यांच्या मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे.

Advertisement
Leave a comment