पुणे – करोनाच्या (corona) संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला (Ashadhi Wari) खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता करोना (corona) आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची भेट घेण्यासाठी पंढरपूरला (pandharpur) जाणार आहेत. यंदा पायी वारी (Pandharpur Wari 2022) निघणार आहे.

तब्बल दोन वर्षांनी यंदा पुन्हा एकदा विठू नामाचा जयघोष असून, राज्य शासन व जिल्हा प्रशासनांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारीची तयारी सुरु झाली आहे.

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh)यांच्या मार्गदर्शनाखाली वारीची जोरदार तयारी सुरु आहे.

Advertisement

दरम्यान, यंदाच्या पायी वारीची संपूर्ण रूपरेषा कशी असणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2022 ची (Palkhi sohala) तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे,

मूलभूत सोई-सुविधा (Basic amenities) आदीं सर्वगोष्टीची तयारी येत्या 15 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

Advertisement

श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होत असताना जिल्ह्यातील मुक्कामांच्या ठिकाणाची दुरुस्ती करण्यात करण्यास सुरवात केली आहे.

आषाढी वारीसाठी 37 विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.70 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

तसेच, वारीमध्ये मोठ्याप्रमाणात महिलांचा सहभाग असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद आणि दोन्ही महानगरपालिकेतर्फे महिलांना आरोग्याच्या सुविधेसह स्त्रीरोग ततज्ज्ञांचा पुरवठा केला जाणार आहे.

Advertisement

त्यामुळे महिलांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजूची मांसाहाराची, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे.