पुणे – करोनाच्या (corona) संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला (Ashadhi Wari) खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता करोना (corona) आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध हटवले. त्यामुळे पुन्हा एकदा भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची भेट घेण्यासाठी पंढरपूरला (pandharpur) जाणार आहेत.

यंदा पायी वारी (Pandharpur Wari) निघणार असून, तब्बल दोन वर्षानंतर आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात पालखी सोहळा (Palkhi Ceremony) रंगणार आहे.

10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून जून महिन्यापासूनच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम (Saint Tukaram) महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होते.

Advertisement

20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) 337 वा पालखी सोहळाचे 20 जून रोजी पंढरपूरकडे (Pandharpur) होणार प्रस्थान होणार आहे.

9 जूलैला वाखरी तळावर पालखी पोहोचणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे यंदा वारी सोहळा उत्साहात होणार आहे.

करोनाच्या काळात लावलेल्या निर्बंधामुळे लोकांच्या वारकऱ्यांच्या मनासारखी वारी झाली नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून

Advertisement

करोनाचं सावट कमी झाल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर राज्य सरकारकडून पायी वारीला परवानगी मिळालेली आहे.

दरम्यान, आता पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. देवस्थान समितीकडून या पालखी सोहळ्यातील सुमारे दोन टन वजनाचे पालखी रथासाठी

निरोगी, धष्टपुष्ट, टोकदार शिंगे, वशिंड ,पांढराशुभ्र देखण्या दोन बैलजोड्यांची तपासणी करून निवड करण्यात येणार आहे.

Advertisement

तसेच पालखी सोहळ्यातील चौघडा गाडीसाठी एक बैलजोडीची निवड करण्यात येणार आहे. यासाठीचे प्रक्रिया सुद्धा सुरु करण्यात आली आहे.

जगद्‌गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी 337 व्या पायीवारी पालखी सोहळ्याच्या पालखी रथासाठी 2 बैल जोड्या तर

चौघडा गाडीसाठी एक बैल जोडी निवडण्यात येणार आहे. या करता देवस्थान समितीकडून बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Advertisement

बुधवारी (दि.18) व गुरुवारी ( दि.19 ) असे दोन दिवसांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत संस्थाच्या कार्यालयात हे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.