पुणे – करोना (corona) संकटाच्या दोन वर्षांच्या कालखंडात माउलींच्या सोबतीने विठुरायाच्या भेटीला जाण्याची रुखरुख आज संपली… संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या (Ashadhi Wari) वाटेवर निघाला… श्रीक्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आषाढीच्या अलौकिक सोहळ्यासाठी पंढरीकडे (Pandharpur wari 2022) प्रस्थान ठेवले.

22 आणि 23 तारखेला माउलींच्या पालखीने पुण्यात मुक्काम केल्यानंतर माऊलींची पालखी दिवे घाटाच्या (Dive Ghat) दिशेने सासवड,

जेजुरी आणि बारामती मुक्कामानंतर आता वैष्णवांचा मेळा पुणे मुक्कामानंतर आता पंढरीच्या दिशेन (Ashadhi Wari) मार्गस्थ झाला आहे.

दरम्यान, यावेळी मार्गात काटेवाडी येथे परंपरेनुसार मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण झाले असून, सर्वत्र भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.

बारामती-काटेवाडी मार्गावर मोतीबा, पिंपळी ग्रेप, लिमटेकमध्ये दुसरी विश्रांती घेत पालखीने काटेवाडी येथे प्रवेश केला, त्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले.

विश्रांतीनंतर पालखी पुन्हा मार्गस्थ होताना मेंढ्यांच्या रिंगणाचा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा रंगला. परंपरेनुसार धनगर समाजाकडून हा रिंगण सोहळा आयोजित केला जातो.

मेंढयांचे आरोग्य उत्तम राहो, धनगर समाजाची व्यवसायात प्रगती होवो, अशी श्रध्दा या मागे असल्याची माहिती समाजातील व्यक्ती देतात. रिंगण सोहळ्याला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. पुढे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

संत तुकोबांचा पालखी (Pandharpur wari 2022) सोहळा आता बारामती तालुक्यामधून इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यावर साखर कारखान्याच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, आता पालखी संध्याकाळी सणसर मुक्कामी पोहोचली असून, आज गुरुवारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवंडी येथे रंगणार आहे.