बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांत घबराट

बिबट्याचा वावर आता सर्वत्रच वाढला आहे. भोर-महाड दरम्यानच्या वरंध घाटात तर जंगल आहे. जंगल सोडून रस्त्यावर बिबट्या दिसायला लागल्याने पर्यटकांत घबराट निर्माण झाली आहे.

घाटात गस्त सुरू

वरंध घाटात पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर सर्वत्र फिरत आहे. त्यामुळे कोकणात जाणारे नागरिक व पर्यटकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून घाटात नागरिकांत जनजागृती तसेच पेट्रोलिंग केले जात आहे.

घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात दोनतीन दिवसांपूर्वी पर्यटकांना घाटातील डोंगराकडे जाताना महाड हद्दीत बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर सर्वत्र फिरत आहे.

भोर शहरात व तालुक्यांत बिबट्याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र यामुळे कोकणात जाणारे चाकरमानी व फिरायला जाणाऱ्या पर्यटकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

निसर्गाचा आनंद लुटताना राहा सतर्क

कोसळणारा धो धो पाऊस आणी हिरव्यागार डोंगर दऱ्यातून फेसाळत वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, बिबट्या दिसल्याने नागरिक व पर्यटकांत भीतीचे वातावण निर्माण झालेले आहे.

वरंधा घाटामध्ये बिबट्या आढळून आल्याने पर्यटकांनी व नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून, याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.