मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी एकीकडे राजीनाम्याचे सत्र सुरू केले असताना पक्षाच्या सचिव पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्या भेट घेणार असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नगर, बीडमध्ये राजीनामाअस्त्र

प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

या सर्व घटना घडत असतानाच पंकजा या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत पंकजा मुंडे यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

या बैठकीनंतर मंगळवारी पंकजा मुंडे मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. पंकजा यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीत मोठा निर्णय होऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली दाै-यावर नजरा

भाजपमधील मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे बीड जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतरबीडमधील तीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे.

Advertisement

विस्ताराच्या दिवशीही मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे पंकजा यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

समर्थकांची बाजू मांडणार का ?

सूत्रांच्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत पंकजा सहभागी होणार आहेत.

या वेळी पंकजा मुंडे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Advertisement