केद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यानं मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे.

त्यामुळे पंकजा मुंडे तातडीनं नवी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. भाजपच्या अध्यक्षांची बैठक घेतल्यानंतर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत.

संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी

जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी पंकजा अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत.

Advertisement

त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मोदी यांच्यासोबत चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा दिल्लीत दाखल झाल्या होत्या.

दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डा आणि पक्षाचे इतर राष्ट्रीय सचिवही उपस्थित आहेत.

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत व्यूहरचना

मोदी भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांशी चर्चा करणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी या सचिवांशी संवाद साधणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सरकार म्हणून केलेली कामे याबाबत या सचिवांशी मोदी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं.

पंकजा नाराजी व्यक्त करणार

मुंडे या पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्याकडे मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करणार असल्याचं सांगितलं जात आहे; मात्र मोदी यांच्याकडून पंकजा यांना वेगळा वेळ मिळण्याची शक्यता कमी आहे.

 

Advertisement