पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बीड जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धाडसी वक्तव्य केले आहे.

मोदी यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्याबद्दलच केलेले मुंडे यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचाय, पण ते मला संपवू शकणार नाहीत, असे मुंडे म्हणाल्या.

मुंडे म्हणाल्या, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, असे म्हणून त्या थोडावेळ थांबल्या.

पुढे म्हणाल्या, मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकतं नाही. मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते मला संपवू शकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.