बांधकाम व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना उजेडात येत आहेत. त्यात प्रसिद्ध असलेल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश आहे. डीएसकेनंतर आता परांजपे बंधूना गजाआड व्हावे लागले.

मुंबई पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूंना मुंबईच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या आरोपाखाली श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांना पुण्यातील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं.

70 वर्षीय महिलेची तक्रार

विलेपार्ले पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वसुंधरा डोंगरे नावाच्या 70 वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. जागेबाबत कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. बिल्डर बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातून मध्यरात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यात आणले.

Advertisement

फसवणूक केल्याबाबत गुन्हा

परांजपे बंधूंसह चार जणांवर विलेपार्ले पोलिस ठाण्यात कलम गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खोटी कागदपत्र बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

बिल्डर श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक परांजपे या दोघा बंधूंना ताब्यात घेऊन विलेपार्ले पोलिस पुढील तपास करत आहेत.
लंकड ग्रुपच्या मालकालाही अटक

नुकतंच पुण्यातील लंकड रिअॅ लिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ग्रुपकडून ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लंकड रिअॅालिटी फर्म्सचा मालक अमित लंकडला अटक केली.

Advertisement