ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

फीवाढ, पुस्तक सक्तीविरोधात पालकांचा शाळेत रात्रीपर्यंत ठिय्या

राज्य सरकारने फी वाढीबाबत शाळांना सबुरीचा सल्ला दिला असला, तरी शाळा काही ऐकायला तयार नाहीत.

फी वाढ आणि महागड्या प्रकाशनाच्या पुसत्क सक्तीविरोधात दिवा येथील एसएमजी विद्यालयातील पालकांनी रात्री उशिरापर्यंत शाळेत ठिय्या मांडला होता. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

महाग़डी पुस्तके माथी मारण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या थैमानाने आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्यांना शाळांनी वेठीस धरले आहे. हजारो रुपयां महागडी पुस्तके पालकांच्या माथी मारण्याचा अजब प्रकार दिवा येथील एसएमजी विद्यालयाने केला.

शाळेने कोरोना काळात फी वाढ करू नये, या सरकारच्या आदेशाला हरताळ फासत फी वाढ तर केली आणि त्यावर हुकूम मॅकमिलन पब्लिकेशनची महागडी पुस्तके घेण्याची सक्ती केल्याने पालक हतबल झाले आहेत.

पालकांची पिळनवणूक

आतापर्यंत चलनात असलेल्या नवनीत किंवा विकास पब्लिकेशनची स्वस्त पुस्तके रद्दबातल करत पालकांची पिळवणूक सुरू केली.

नवनीत आणि विकास पब्लिकेशनची पुस्तके केवळ 1200 रुपयांना मिळत असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तब्बल 5500 रुपयांची मॅकमिलन पब्लिकेशनची पुस्तके घेण्याची सक्ती शाळेने केल्याने पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

त्यात कहर म्हणजे ही पुस्तके दिवा स्थानकाजवळील प्रोमोशन नावाच्या दुकानातूनच घ्यावीत, अशी सक्ती पालकांवर करण्यात आली. यातून शाळेचे पब्लिकेशन आणि दुकानाशी असलेले आर्थिक लागेबांधे स्पष्ट होतात.

शाळेच्या या मनमानीविरोधात पालकांनी जून 2021 या एकाच महिन्यात तीन वेळा आंदोलनं केली; परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने ही आंदोलने मागे घेण्यात आली.

अखेर 30 जून रोजी शाळेचे व्यवस्थापक स्वप्नील गायकर यांनी फीवाढ मागे घेत वर फीमध्ये 15 टक्के सवलत देत मॅकमिलन पब्लिकेशन रद्द केल्याची तोंडी घोषणा केली.

काही दिवसातच आपल्या निर्णयावर घूमजाव केले. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी आज शाळेत ठिय्या आंदोलन केले.

रात्र झाली तरीही पालक हटत नसल्याचे लक्षातच आल्याने पोलिसांनी पालकांना घरी जाण्याचे आवाहन केले व त्याचे पालन न केल्यास अटकेची धमकीदेखील दिली.

आपली मागणी रास्त असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यात लक्ष देऊन पालकांना न्याय द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालकांनी दिला.

 

You might also like
2 li