ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पाषाण ते कोथरुड आणि पाषाण ते गोखलेनगर बोगद्यांना गती देणार

पुण्यातील कोथरूड रस्ता तसेच सेनापती बापट रस्त्यावर कायमच वाहतुकीची कोंडी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी पाषाण ते कोथरूड आणि पाषाण ते गोखलेनगर या ठिकाणी दोन बोगदे प्रस्तावित आहेत. त्यांच्या कामांना गती देण्यात येणार आहे.

अजित पवार यांचे निर्देश

पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत करण्यासोबतच सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार आहे.

यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली असून या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.

अंतर निम्म्याने कमी होणार

याबाबत मोहोळ म्हणाले, की कोथरूड ते पाषाण हे सध्याचे अंतर चांदणी चौकमार्गे साडेआठ किलोमीटर तर सेनापती बापट रोडमार्गे हेच अंतर साडेनऊ किलोमीटर इतके आहे.

बोगदा पूर्ण झाल्यावर हेच अंतर चार किलोमीटर इतके होणार आहे, तर पाषाण रोड ते गोखलेनगर हे अंतर सव्वा चार किलोमीटर असून बोगदा झाल्यावर हेच अंतर २.९ किलोमीटर होणार आहे. कोथरूड ते पंचवटी या बोगद्याची लांबी १ हजार ९० मीटर, तर पंचवटी ते गोखलेनगर या बोगद्याची लांबी ५८० मीटर इतकी आहे.

 

You might also like
2 li