file photo

मुंबई : रेल्वेने प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. डेक्कन क्वीन ही तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव. तिच्यात आता आमुलाग्र बदल करण्यात आला आहे.

बुकिंग फुल्ल

मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसला पहिल्यांदाच जोडलेल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांची पसंती मिळाली आहे.

डेक्कन क्वीन पहिल्याच फेरीच्या व्हिस्टाडोम कोचच्या 44 सीट्सचे बुकिंग फुल्ल झाले. सीएसएमटी स्थानकातून सकाळी सात वाजता डेक्कन एक्स्प्रेस धावली. या वेळी प्लॅटफॉर्मवर कोचजवळील सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.

Advertisement

तसेच गाडी सुटण्यापूर्वी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केक कापून आपला आनंद व्यक्त केला.

निसर्ग दर्शनाचा आनंद

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे बंद असलेली डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

व्हिस्टाडोम कोचने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी पसंती दिली आहे. प्रवासी उमेश मिश्रा जे आपल्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करीत होते, त्यांनी व्हिस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले.

Advertisement

मोठ्या खिडक्या आणि फिरणा-या आसनांमुळे मुलांना निसर्गाचा आनंद लुटता आल्याचे उमेश यांनी सांगितले.

तसेच व्हिस्टाडोम कोचमुळे पावसाळ्यातील घाटाच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येईल, असे प्रवासी सायली यांनी सांगितले. सायली या मुंबई-पुणे मार्गावर नियमित प्रवासी आहेत.

जागतिक दर्जाच्या सुविधा

रेल्वेच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी भारतीय रेल्वे सतत प्रयत्नशील असल्याचे ट्विट पीयूष गोयल यांनी केले आहे.

Advertisement