पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नगरसेवक (BJP corporator) धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी पुण्यामध्ये (Pune) ‘जिथे गरज तिथे धीरज’ अशा प्रकारचे बॅनर (Banner) लावले आहेत. त्यांनतर त्यांच्या विरोधात प्रहारात अजून दोन बॅनर लावले आहेत.

भाजप नगरसेवक (BJP) धीरज घाटे यांनी पुण्यामध्ये नागरीकांच्या मदतीसाठी ‘जिथे गरज तिथे धीरज’ असे फ्लेक्स लावले आहेत. त्यानंतर त्या फ्लेक्सखालीच २ लहान बॅनर लावण्यात आले आहेत.

धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट – नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख’ अशा प्रकारची वाक्ये त्या बॅनरवर लिहिण्यात आली आहेत.

Advertisement

पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना (Pune Municipal Corporation) जाहीर झाल्यावर धीरज घाटे यांनी बॅनर लावले आहेत.

त्यानंतर त्यांच्या विरोधात बॅनर नेमक कुणी लावले आहेत, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु यामुळे पुण्यात पालिकेच्या निवडणुकीवरून बॅनर युद्ध रंगले आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडूना मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक पक्षाकडून वेगवगेळे तर्क विर्तक लढवले जात आहेत.

Advertisement

अनेक ठिकाणी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागांची रचना आणि हद्द यावरून वाद निर्माण होत आहेत.