“भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी आहे. या समाजातील लोकांचा वापर करून नंतर त्यांना बाजूला करतात. याचा वारंवार अनुभव आलेला आहे.

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपने वापर करून नंतर त्यांना डावलले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

खडसेंच्या बदनामीसाठी घोटाळ्याचे षडयंत्र

पटोले म्हणाले, की खडसे यांना बदनाम केले गेले, झोटींग समितीचा अहवाल गहाळ झाला अशा बातम्या येत आहेत.

Advertisement

खडसेंना बदनाम करण्यासाठीच घोटाळ्याचे षडयंत्र रचले गेले असू शकते, असा संशय येतो. भाजप हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही न्यायालयात रद्द झाले आहे.

मोदी सरकारकडून देशाची लूट

“पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सामान्य जनता महागाईने बेहाल झाली आहे आणि मोदी सरकार देशाला लुटायचे काम करत आहे. त्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सामान्य माणसांसाठी संघर्ष करत आहे.

मोदी सरकार लसीकरणात अपयशी ठरले आहे. चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे. या महत्वाच्या प्रश्नांवर मोदी सरकार चकार शब्द काढत नाही.

Advertisement

काँग्रेस या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असताना भाजपा जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून दुसरीकडे वळवत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

राज्य सरकारविरोधात बदनामीची मोहीम

“मविआ सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पाडण्याचा भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे; पण त्यात त्यांना यश आले नाही. याचाच एक भाग म्हणून मविआ सरकारच्या विरोधात सुरुवातीपासून बदनामीची मोहिम राबवली गेली.

शंभर कोटी रुपयांचे वसुलीप्रकरण त्यातीलच एक आहे. ज्यांनी आरोप केला, त्या परमबीरसिंग व सचिन वाझे यांची चौकशी का केली जात नाही.

Advertisement

अँटिलिया बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या? हा मुख्य मुद्दा असताना त्याचा तपास केला जात नाही, हे सर्व स्क्रिप्टेड असून त्याप्रमाणेच होत आहे,” असा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

 

Advertisement